Friday, November 5, 2010

परेड फौंडेशन डे- भाग २

सर्वात अगोदर एक मोठा सॉरी. ब्रेक के बाद म्हटले होते. तो ब्रेक खूपच लांबला. फौन्डेशन डे च्या गमती जमती राहून गेल्या पण एक बरे झाले की इतक्या दिवसांनंतर पुन्हा त्या आठवण्याची संधी मिळाली. इथे एक मज्जा म्हणजे सगळेच जण एकदम पारंपारिक पेहरावात होते. मुली साड्या, नववारी, तर मुले, झब्बा, लेंगा, धोतर अशा वेशात. सगळ्यांना नेहमी परेड गणवेशात पाहण्याची सवय त्यामुळे ह्या पेहरावात सर्वाना बघून खूपच मज्जा वाटली. तसेच बापू नेहमी सांगतात जसा कार्यक्रम तसा वेश, त्याप्रमाणेच सगळे तयार होऊन आले होते.  दिवसाची सुरुवात येणाऱ्या dmvs च्या नोंदणीने व चहा नाश्त्याने झाली. ते होई पर्यंत बापूंचे आगमन झाले.
मस्त सजवलेल्या पालखीतून बापूंना दिंडीतून घेऊन आलो. गेट १ पासून गेट ४ पर्यंत रस्त्यावरून दिंडी जोरदार आली. गेट ४ वर बापूंचे औक्षण करून आत आले ते पुन्हा एकदा बहारदार पणे जल्लोषात स्वागत झाले. आत hall मध्ये स्टेजवर विराजमान झाले. त्या नंतर पादुका पूजन ला सुरुवात झाली पादुकापूजन सांगणारे पण DMV व करणारे पण. पादुका पूजन झाले नंतर कावड मधून वाजत गाजत बापुंसाठी लड्यांचा नैवेद्य आणला गेला. पुन्हा एकदा धम्माल नाचले सगळे. ह्या वेळी तर समीरदादा, पौरससिंह व स्वप्नीलसिंह पण हजर होते त्या मुळे तर आणखीन धम्माल. नैवेद्य अर्पण झाल्यावर समीरदादा, पौरससिंह व स्वप्नीलसिंह ह्यांनी मुलां मध्ये मिसळून धम्माल केली. समीरदादांना पाणी आणू का म्हणून एका सरांनी विचारले तर दादांनी मस्त उत्तर दिले. ते म्हणाले की मला तहान लागली तर मी घेईन पण इथे मला वेगळी treatment देऊ नका. आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायला हवे की बापू, नंदाई आणि सुचीतदादा एका बाजूला व आपण सगळे एका बाजूला. इथे ते तिघे सोडून कोणीच मोठा नाही. सगळे एकच लेवेल चे आहोत. नंतर मुलांशी गप्पा मारताना ते म्हणाले की तरुण पिढीने समोर येऊन जवाबदारी घ्यायला शिकायला हवी, त्यांनी पण मोठे व्हायला हवे. मोठे म्हणजे जवाबदारी घेऊन काम यशस्वीपणे पार पाडून दाखवणे. तिथे दुसर्या बाजूला तर स्वप्निलसिंह आणि पौरससिंह ची दे धम्माल चालू होती आपल्याच वयाच्या मुलां मध्ये ते इतके मिसळून गेले होते की जवळ जवळ दोन गट पडून गेले होते. तिथून पौरससिंह काही तरी बोलले की स्वप्नीलसिंह चे उत्तर तयार आणि त्यांनी काही बोलायच्या आत पौरससिंह चे उत्तर तयार. जाम एकमेकांची खेचत होते आणि त्यात मुलं पण सहभाग घेत होती आणि एकच हास्यकल्लोळ उठत होता. बेचारे पठण करणारी मंडळी वाट बघत होती की आम्ही कधी सुरु करायचे पण आमची मस्ती काही थांबेना शेवटी दादांनी सांगितल्यावर पठणाला सुरुवात झाली. आदिमाता शुभंकर स्तोत्र, आदिमाता अशुभनाशिनी स्तोत्र, दत्तमाला मंत्र, गुरुमंत्र, गुरुचरित्र अध्याय १४, हनुमानचलिसा, दत्तबावनी, ह्यांचे पठण झाले. एका बाजूला चरखा सेवा सुरु होतीच. त्यानंतर सत्संग झाला. सत्संग च्या वेळी पुन्हा धम्माल. दे दणादण नाचत होते सगळे. प्रत्येक उत्सवात DMV म्हणून सेवा करताना ह्या मुलांना क्वचितच कधी गजरांवर नाचायची संधी मिळते. ती संधी फक्त वर्षातून एक वेळेला मिळते आणि तिचा पुरेपूर फायदा मुले घेतात. दुपारी जेवणाच्या वेळी जेवणाबरोबरच पुन्हा एकदा वाजत गाजत कावड मधून गोधड्यांचा नैवेद्य बापू, आई, दादांना अर्पण करण्यात आला. संध्याकाळ झाली आणि घोरकश्तोधरण स्तोत्र पठाणाची वेळ झाली. बाहेरची भक्त मंडळी पण यायला लागली. पठण सुरु झाले आणि मुलं पण हळू हळू जेऊन यायला लागली. जेऊन फ्रेश होऊन मुलं पठणाला बसली. भक्त मंडळींचे येणे जाणे चालू होतेच. त्यांची बसायची व्यवस्था, दर्शनाची रंग, information hub वर त्यांना नेऊन माहिती सांगणे ह्यात मुलं पुन्हा एकदा रंगून गेली. तेवढ्यात निरोप आला की आई येते. पुन्हा चैतन्याचे वातावरण. सगळेच एकदम सज्ज झाले. आणि नंदाई सुचीतदादांबरोबर आली. dmvs ची स्वयंशिस्त पुन्हा एकदा अनुभवली. आई येण्याचा आनंद जेवढा तेवढाच तिला आपल्यामुळे काही त्रास होऊ नये म्हणून ही काळजी पण. आई व दादांनी स्तगेवर येऊन दत्तबाप्पा चे दर्शन घेतले. पादुकांना केलेल्या लडयांचे लोड व गादी तसेच, दत्ताबाप्पा, बापू, आई, दादांच्या, फोटोना घातलेले लडयांचे हार, ह्यावरून आई ने हाथ फिरवला, खूप खूप खुश होती माझी आई तेव्हा. आम्हा सर्वाना म्हणाली की तुमच्या efforts चे हे फळ आहे. तिचे हे शब्द ऐकून तर आम्ही सगळे सातव्या स्वर्गात पोचलो. पण लगेच खाली यावे लागले कारण आई परत जायला निघाली तर तिला रांगोळी आणि सर्व दाखवायचे होते. प्रवेशद्वारावारचे गोधाद्यांचे व जुने ते सोने मध्ये द्यायच्या साड्यांचे तोरण बघून तर ती जाम आनंदली. म्हणाली की आता तुम्हाला आपल्या संस्थेचे कार्य कळले आहे. तिच्या त्या आनंदात आम्ही इतके हरखून गेलो की दुसर्या बाजूला असलेले information hub दाखवायचे राहून गेले. आई परत गेली आणि मग लक्षात आले आणि सगळेच चुकचुकले. पण तेवढ्यात सगळ्यांनी एकमेकांना बजावले की बापू आल्यावर अजिबात विसरायचे नाही. घोरकश्तोद्धरण स्तोत्र पठण संपले आणि पुन्हा एकवार सत्संगाची मंडळी स्टेजवर बसली. पहिले २ अभंग झाले आणि बापू येणार ह्याची चाहूल लागली. मग काय सगळीच मज्जा. कोणाचे सत्संगात लक्ष लागेना. सगळे जण बापू यायच्या दिशेला तोंड करून बसले. सत्संग तर actually थांबवला. जसे बापू येणार असे कळले तसे लगेच जय जय रामकृष्ण हरी चा गजर चालू झाला आणि बापूंचे hall मध्ये आगमन होताच अनिरुद्ध आला रे आला चा गजर सुरु झाला दिवाळी दसरा काय असतो ते कळले. पुन्हा एकवार बापूंनी स्वतःचे ब्रीद कायम ठेवले. तुम्ही एक पाऊल उचलले की पुढची ९९ पावले तो येतो. आम्ही फक्त त्याला जे हवे आहे ते देण्याचं थोडासा प्रयत्न केला आणि तो आमच्यासाठी पुढची सगळी पावले धावत आला.

बापूंचे आगमन झाले आणि ते आत गेले. आम्हाला काही कळेना काय ते. आम्हाला आधी धाकधूक होती की आई जशी घाईत आली तसेच हे पण घाईत येतील आणि जातील. पण हे आले ते सरळ आतच गेले ते पण येतो असे सांगून. आम्ही सगळे भांबावून गेलो. तेवढ्यात लगबगीने सोफा स्टेजवर मांडण्यात आला. सर्व तयारी झाली. ओहो! अहाहा! मग प्रकाश पडला बापू आले ते घाईने परत जाण्यासाठी नव्हे तर आम्हावर छप्पर फाडून प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी. बापू थोड्या वेळाने स्टेजवर येऊन बसले आणि म्हणाले की disaster चा अर्थ काय. त्यांनी उदाहरण काय द्यावे? सगळे सत्संग ऐकायला मंडळी बसली आहेत, सत्संग करणरी मंडळी पण तयार आहेत आणि त्यात जर मी म्हटले की मी (बापू) गाणं म्हणणार की जे होणार ते disaster. बापू पण ना लबाडी काही केल्या सुटत नाही त्यांची. आणि वरून त्यांच्या सगळ्या लहान-लहान पोरांनी आयोजित केलेला कार्यक्रम म्हटले की ते पण आमच्या सारखेच लहान झाले होते. तशीच मस्ती करत होते. पण तेव्हाच typical बाबांप्रमाणे सर्वाना मार्गदर्शन पण केले. ते म्हणाले की स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्याचा जीव वाचवायचा हे योग्य नाही. उदा: परीक्षेसाठी जात आहोत आणि रस्त्यावर कोणाचा अपघात झाला असेल तर त्यावेळी परीक्षा देणे महत्वाचे. पण तेच जर सिनेमाला जात असताना असे झाले तर त्यावेळी त्या अपघात स्थळी मदत करणे आवश्यक.                

नंतर सत्संग सुरु झाला आणि एकच धम्माल उडाली. आई चा जोगवा, बापू के संग करो माखन की चोरी ह्या गजरावर तर जी धम्माल केलिया हे ना की फक्त तो hall आणि ती बिल्डींग खाली यायचे बाकी होते. (हे सगळे गजर/ अभंग आपण पुन्हा ब्लोग मधून बघणार आहोतच) 'जे न आले ते तसेच राहिले' प्रमाणे जे नाही आले त्या दिवशी आमंत्रण देऊन सुद्धा त्यांची गत झाली. इतकी मज्जा कधीच अनुभवली नव्हती. आजी सोनियाचा दिनू ह्या प्रमाणे सर्वांची गत झाली आणि ह्या सर्वांवर कळस म्हणजे बापूंचे सत्संगच्या शेवटी म्हटलेले वाक्य- कधी दमलात, कंटाळलात, निराश झालात, depression येते असे वाटले की परत परत मनात एकच वाक्य आठवायचे, स्वताच्या कानांनी स्वतःच हे वाक्य ऐकायचे- I Love You

ह्या वाक्य नंतर जो जल्लोष झाला तो तर सांगायलाच नको. आणि अजून पण द्यायचे बाकी होते म्हणून की काय सर्व परेड DMV न बोलावून बापू म्हणाले की असेच तरुण राहा कायम.

त्या नंतर बापूना जाताना information hub वर नेऊन सर्व माहिती देण्यात आली. परेड व्यतिरिक्त मुले अजून जे काही उपक्रम करतात ते सुद्धा सांगितले. पिकनिक ला जाणे सेवेत भाग घेणे ई.

अजून काय लिहू ह्या दिवसा बद्दल? ज्यांनी तो दिवस अनुभवला त्यांच्या तोंडून ह्या दिवसाची गम्मत ऐकायला मिळाली तर जरूर ऐका. तुम्ही स्वतः पण तिथेच होता असे वाटल्या शिवाय राहणार नाही आणि हेच बापूंना अपेक्षित आहे, आपल्याला मिळालेला आनंद इतरांना वाटायचा आणि स्वतः त्यातून पुन्हा आनंदी व्हायायचे.

5 comments:

Mannmath said...

धन्यवाद प्रिती..........हेच वाचायला मी खूप अधीर होते....तू जरा खूपच उशीर केलास लिहायला...पण ठीक आहे...तू लिहलस आणि इतक छान लिहलस...की मला वाटतच नाही...मी काही मिस केले..मी दिवसभर नव्हते..याची खंत होती पण आता ती नाही...तुझा अनुभव वाचल्यावर पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या...खरच...त्या दिवशी उपस्थीत असलेल्या प्रत्येकाने त्यांच अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करण्यास हवा....

Nilangi Atul Sawant said...

Hari Om..Priti...

Tuza ha post vachatana dolyansamor full picturisation zale ....ase vatale ki me harigurugramchya maidanatach aahe ani te sagle anubhavtey.....

Khup dhammal aali vachtana....hyavarunach kalat ki jyani pratyksh ha sohla anubhavla...te tar speechlessch zale astil.....

next partchi aaturtene vat baghtey..

je attand nahi karu shakle ha sohala,tyana manat kuthetar vait vatale asel na...tyana tuzha ha lekh nakkich bharpur kahi devun jail......

Hari om.......

Nilangi Atul Sawant said...

Hari Om..Priti...

Tuza ha post vachatana dolyansamor full picturisation zale ....ase vatale ki me harigurugramchya maidanatach aahe ani te sagle anubhavtey.....

Khup dhammal aali vachtana....hyavarunach kalat ki jyani pratyksh ha sohla anubhavla...te tar speechlessch zale astil.....

next partchi aaturtene vat baghtey..

je attand nahi karu shakle ha sohala,tyana manat kuthetar vait vatale asel na...tyana tuzha ha lekh nakkich bharpur kahi devun jail......

Hari om.......

Unknown said...

Thanks a ton to all DMV's. We could be a part of Parade Foundation Day.
It was a wonderful experience that we all will cherish for lifelong.
The team spirit of all Parade DMV's was one thing to be really appreciated. All others wonderful things planned were emerged from this team spirit.
I wish to see more of such team spirit everywhere.

Narendra Raut said...

Shree Ram!