Saturday, December 11, 2010

अनिरुद्ध पौर्णिमा २०१०



हरी ओम,


भरपूर दिवस झाले गप्पा मारून नई? कसे जात आहेत दिवस पत्ताच लागत नाही. म्हणता म्हणता २०१० वर्ष संपत आलं. अनिरुद्ध पौर्णिमेच्या गडबडीत दिवस पटापट जात होते. अनिरुद्ध पौर्णिमेची परेड अतिशय छान झाली. सर्वांकडून खूप कौतुक झाले परेडचे (श्रीराम). ह्या वर्षी परेड ची संख्या तर अफाट होती. तब्बल ७५० DMVs नी ३० प्लाटून मधून मार्चपास केले आणि ह्यात सर्वात जास्त संख्या होती ती मुंबई बाहेरील DMVs ची आणि ते सुद्धा लहान लहान गावातून सुद्धा बरीच मंडळी आली होती. संस्थेतर्फे कोल्हापूर मेडिकल कॅंप जिथे आयोजित केला जातो त्या गावातील मुलेसुद्धा परेड मध्ये सहभागी होती. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन; yes मला माझ्या बापूला सल्यूट  करायचा आहे. आणि म्हणूनच तो भावाचा भुकेला देव पण त्याच्या बाळांना सल्यूट करतो.   

परेड करताना बापूंचे शब्द ' बाळानो तुम्ही परेड करता म्हणून मी सल्यूट करतो' हे वाक्य आठवत होता आणि तो क्षण आला. बापूंच्या समोरून त्यांना सल्यूट करत जाताना होणारा आनंद तर अवर्णनीयच. तो फक्त अनुभवता येतो. शब्दात मांडणे कठीण. सगळेच्या सगळे परेड केलेली मंडळी हेच उत्तर देतील आणि ते उत्तर शोधण्यासाठी तरी प्रत्येकाने एकदा तरी परेड करावीच. त्या बापूरायाला  सल्यूट  करणे, त्याचा कडून तो सल्यूट घेणे म्हणजे अगदी out of this world feeling असते. 

ह्या वर्षी तर सर्वत्र परेड एकदम छा गई. कारण अनिरुद्ध पौर्णिमेनंतर होणार्या अधिवेशनामध्ये तर श्री समीरदादानी घोषणा केली की प्रत्येक उपासना केंद्रावर परेड ग्रुप सुरु व्हायला हवे आणि तिथे फक्त परेडच नव्हे तर रेस्क्यू प्रॅक्टीस, फायर फायटिंग ट्रेनिंग, स्पोर्ट्स हे सर्व असणार आणि एक रविवार संस्थे तर्फे आयोजित निष्काम भक्तिमय सेवेसाठी राखीव असणार. तसेच ५ वा रविवार सुट्टीचा. मग काय मज्जाच मज्जा. आज पर्यंत परेड म्हणजे बर्याच जणांना १-२-१ असेच वाटायचे पण आता कळेल की काय काय धम्माल असते.     

अधिवेशनात घोषणा झाल्यावर तर ह्या रविवार पासून मुंबईत जोगेश्वरी व मरोळ येथे २ नवीन परेड केंद्र सुरु देखील झाली आणि घोषणा व्हायच्या आधीच परेड मार्चपास बघून पार हैदराबाद आणि लखनौ कडून विचारणा सुद्धा झाली. लवकरच तिथे पण बापू कृपेने परेड सुरु होयील.      

हीच तर गम्मत आहे ना जितकं देता तुम्ही त्याच्या किती तरी पटीने जास्त मिळते. हा बापू फक्त देण्यासाठी आलाय. बापूला आवडणाऱ्या ९ थेंबांमधे परमेश्वराच्या कार्यासाठी व सेवेसाठी परिश्रम करताना येणाऱ्या घामाचे थेंब ह्यांचा पण समावेश आहे.

शेवटी प्रश्न ज्याचा त्याचा आहे, 'त्या'ला आवडणाऱ्या गोष्टी द्यायच्या की नाही !! 


(अनिरुद्ध पौर्णिमा २०१० ची मार्च पास बघण्यासाठी www.manasamarthydata.com ह्या website वर भेट द्या)