अनेक श्रध्दावानांची अजूनही व्यवस्थित उपासना होत नाही, किंबहूना गुरुमंत्राची दिक्षा बापूंकडून मिळूनही अनेक श्रध्दावानांच्या मनात अनेक तर्ककुतर्क आहेत. त्यामुळेच त्यांना ह्या गुरुमंत्राचे फळ प्राप्त होत नाही या सर्वावर उपाय म्हणून बापूंनी स्वतः घोर तपश्चर्या करण्याचे ठरविले आहे.
बापूंची ही तपश्चर्या प्रामुख्याने तीन प्रकारे होणार आहे.
१) आदिमाता चण्डिकेच्या ब्रम्हत्रिपुरसुंदरी स्वरुपाची उपासना
२) बला अतिबला उपासना
३) सावित्री उपनिषदानुसार सावित्री स्वरुपाची उपासना
या तपश्चर्येचा हेतू :
या गुरुक्षेत्रम् मंत्रावर, या गुरुक्षेत्रम् वर व बापूंवर प्रेम करणार्या सर्व श्रध्दावान भक्ताच्या जास्तीत जास्त चुका कमी करुन, त्यांच्यावर कर्जाच्या राशी जमू नयेत व त्याला जास्तीत जास्त क्षमा मिळावी म्हणून बापू ही तपश्चर्या करणार आहेत.
१) ही उपासना अश्विन शुध्द नवरात्रीच्या अर्थात अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते चैत्र नवरात्रीच्या अर्थात शुभंकरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमी पर्यंत चालणार आहे.
२) या दरम्यान बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचनासाठी येतीलच असे नाही. तसेच ते श्रीहरिगुरुग्राम येथे आले तरी प्रवचन करतीलच असे नाही. या तपश्चर्येदरम्यान बापू पूर्ण मुक्तावस्थेत असणार आहेत.
३) मात्र ते या तपश्चर्येच्या कालखंडात दर दिवशी कमीत कमी एकदा तरी गुरुक्षेत्रम् येथे येणार आहेत. तसेच या दरम्यान ते श्री धनल़क्ष्मी पूजन, अनिरुध्द पौर्णिमा, त्यानंतर असणारे अधिवेशन, आत्मबल कार्यक्रम, गाणगापूर दर्शन, जळगांव दौरा ई. कार्यक्रमांना मात्र नक्की असणार आहेत.
४) या तपश्चर्येच्या दरम्यान श्रीहरिगुरुग्राम येथे काही विशिष्ठ कार्यक्रम होणार आहेत. याचा प्रमुख उद्देश म्हणजे सर्व श्रध्दावानांच्या उपासनांना बळ प्राप्त व्हावे तसेच सर्व श्रध्दावान निश्चिंत, निर्धास्त व्हावेत हा आहे.
५) या तपश्चर्येनंतर बापूंच्या आज्ञेवरून परत सर्व गोष्टी सुरु होतील.
६) बापूंच्या या तपश्चर्ये दरम्यान प्रत्येक श्रध्दावान भक्ताने कमीत कमी एकदा तरी ह्नुमानचलीसा म्हणावी. व ही हनुमान चलीसा त्याने विश्वकल्याणासाठी समर्पित करावी. तसेच या तपश्चर्ये दरम्यान प्रत्येक श्रध्दावानाने स्वताला दूषणे देणे, पापी समजणे, कमी लेखणे पूर्णपणे थांबवावे. व जास्तीत जास्त वेळ भक्ती व उपासनेत घालवावा.
७) या तपश्चर्येचे फलित म्हणजे सर्वांग ब्रम्हास्त्र व सर्वांग करुणाश्रय. अर्थात जे वाईट आहे चुकीचे आहे त्याचा नाश करणारे असे ब्रम्हास्त्र व जो बापूंवर, या भारतावर प्रेम करतो त्याच्यासाठी करुणाश्रय यांची स्थापना बापू गुरुक्षेत्रम् येथे करणार आहेत.
या सर्वाचा भाग म्हणून प.पू सुचितदादांच्या आज्ञेने रविवार दि. २ ऑक्टोबर २०११ रोजी १०८ वेळा अनिरुध्द चलीसा पठणाचा कार्यक्रम श्रीहरिगुरुग्राम येथे सकाळी ९.३० ते रात्रा ८.३० वाजेपर्यंत आयोजीत केला आहे. बापूंच्या या तपश्चर्येदरम्यान प्रत्येक श्रध्दावानाला जास्तीत जास्त ताकद, निर्भयता, निश्चितता प्राप्त व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामुळे प्रत्येक श्रध्दावान भक्त यात सहभागी होऊ शकतो. तसेच येथे प.पू बापू, प.पू नंदाई व प.पू सुचितदादा यांची पदचिन्ह येथे दर्शनासाठी ठेवलेली असतील त्यावर प्रत्येक श्रध्दावान बेल व तुळशीपत्र वाहू शकतो.
" मर्दथ झटतो किती बापू माझा " खरच या बापू एवढी माझी काळजी कोणालाच नाही या माऊलीच्या या तपश्चर्येत आपण खरतर काहीच करु शकत नाही पण त्यानेच सांगितलेल्या भक्तीच्या व उपासनेच्या मार्गाने आपण यात खारीचा वाटा उचलण्याचा तरी प्रयत्न करुया.
-स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये