Monday, April 4, 2011

शुभंकरा नवरात्र

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला आरंभ झाला. २०१० मधली अश्विन नवरात्री आणि २०११ मधली चैत्र नवरात्री ही खूप आगळीवेगळी आहे. दर १००० वर्षांनंतर हा योग येतो जेव्हा महिशासुरमर्दीनीचे ९ ही अवतार नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी तितकेच समानपणे कार्यरत असतात.

अशी ही चैत्र नवरात्र श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे साजरी केली जात आहे. प्रत्येक श्रद्धावान भक्ताने ह्याचा लाभ जरूर घ्यावा.
देवीच्या ह्या उत्सवात नऊ रात्रींचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच सद्गुरू बापूंनी नवरात्रोत्सवात रात्र जागरण अवश्य करावे असे सांगितले आहे. रात्र जागरण करताना अशुभनाशिनी स्तवनम, शुभंकरा स्तवनम, रामरक्षा, श्री गुरुक्षेत्रम मंत्र, इ. चे पठण करू शकतो. तसेच मातृवात्सल्यविन्दानम व रामरसायन ह्यांचे पठण अवश्य करावे. रात्री ९.३० ते २.३० पूर्ण वेळ करावे. पूर्ण रात्र जागरण करून पठण केल्यास अतिशय श्रेयस्कर. सद्गुरू बापूंची ग्वाही आहे की मातृवात्सल्यविन्दानम चे पठण करताना ती आदिमाता साक्षात तिथे येऊन ते पठण श्रवण करते व जिथे आदिमाता तिथे तिचा पुत्र परमात्मा असतोच असतो. त्यामुळे श्रद्धावानांसाठी ही अत्युच्च गोष्ट आहे. 

(बापूंनी सांगितले की जागरण करतेवेळी इतरांना, शेजार्यांना त्रास होऊ नये ह्याची दक्षता बाळगावी तसेच झोप येत असल्यास कडू चवीचा पदार्थ खावा. उदा. कढीपत्ता)