"भारतमध्ये ७ लाख खेडी आहेत. ग्रामीण जीवनाचा विकास झाल्याशिवाय रामराज्य भारतामध्ये अवतरू शकत नाही"- अनिरुद्ध बापू (६/५/२०१०)
रविवार २० फेब्रुवारी २०११ रोजी परम पूज्य बापू, परम पूज्य नंदाई व परम पूज्य सुचीतदादा यांनी सहकुटुंब गोविद्यापीठम येथे भेट देऊन आतापर्यंत स्वप्निलसिंह व त्यांच्या टीमनी केलेल्या ग्रामविकासाच्या कामाची पाहणी केली व मार्गदर्शनही केले. त्याचाच हा सचित्र वृतांत.
ग्रामविकासाचा श्रीगणेशा, गोविद्यापीठम येथून झाला आहे. |
फळबागेची माहिती देताना स्वप्निलसिंह व कौतुकाने ऐकताना नंदाईदिसत आहेत. |
. साईसत्चरितातील २ शेळ्यांची गोष्ट आठवते न ? शेळ्यांवर माया करताना नंदाई व बापू. ह्या शेळ्या पशुपालन उपक्रमांतर्गत पाळल्या आहेत |
पशुपालन अंतर्गत पाळलेल्या वासरांवरून प्रेमाने हात फिरवताना नंदाई |
चारा वैरण अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करताना परम पूज्य बापू आणि परम पूज्य नंदाई |
परस बागेतील भाज्यांच्या लागवडीची पाहणी करताना बापू आणि नंदाई |
सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत खत तयार करण्यात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या गांडूळना उत्साहाने न्याहाळताना बापू, नंदाई व स्वप्निलसिंह |
पाण्याच्या टंचाई वर मात करण्यासाठी बांधलेले शेत तळ्याची पाहणी करताना बापू, आई, दादा |
वनराई बंधार्यात अडवण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बापू आणि नंदाईला सांगताना स्वप्निलसिंह |
बापू, आई आणि दादा, वनराई बंधार्याची पाहणी करताना |