Wednesday, June 22, 2011

गुरुपौर्णिमा २०११

गुरुवार दि १६ जून रोजी प्रवचनात परम पूज्य बापूंनी अत्यंत महत्वाची सूचना केली.

ह्या वर्षी पासून गुरुपौर्णिमेचा उत्सव गुरुपौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त श्रद्धावान भक्तांना गुरुपौर्णिमेला आपल्या सद्गुरूंच्या पावन दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून बापूंनी ही आपल्या सर्वांसाठी सोय केली आहे.

त्याचबरोबर अजून ४ महत्वाच्या सूचना केल्या:

१. साईराम जप करत इष्टिका घेऊन ज्या स्थम्भाला प्रदक्षिणा घालतो त्या स्थंभ मध्ये बदल करण्यात आले आहेत. स्थंभ त्रिकोणी आकाराचा असेल व त्यावर तिन्ही बाजूनी परम पूज्य बापू, परम पूज्य नंदाई आणि परम पूज्य सुचीतदादा यांच्या प्रतिमा असतील आणि त्यावर मध्यभागी कमळ असून त्यात प.पू.बापूच्या मूळ सद्‌गुरुंच्या पादुका असतील परंतु त्या बंदिस्त असतील त्याचं दर्शन कोणाला घेता येणार नाही आणि त्या पादुकांच्याच शेजारी एका बाजुला पुर्वा अवधुत (१ला कुंभ) व दुसर्‍या बाजुला अपुर्वा अवधुत (२४वा कुंभ) असतील (हे दोन्ही सर्वांत श्रेष्ठ असे सिद्ध केलेले कुंभ आहेत) व त्यासोबत श्रेष्ठ अश्या गुरुंच्या पादुका ह्या दोन्हींचा लाभ प्रत्येक भक्तांस मिळणार आहे.

२. मुख्य स्टेज वर श्री नृसिन्ह्सरस्वती स्वामींच्या पादुकांचे पूजन परम पूज्य बापू, परम पूज्य नंदाई आणि परम पूज्य सुचीतदादा करणार व त्यानंतर सर्व भक्तांना पादुकांचे दर्शन घेता येईल.

३. तसेच जो त्रिविक्रम श्री हरीगुरुग्राम येथे दर गुरुवारी असतो त्याचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुजन देणगी मूल्य भरुन प्रत्यक्ष पुजन करता येईल. देणगी मूल्य रुपये ५०१/- व रुपये १००१/- असे असणार. ज्याला जे जमेल ते पूजन श्रद्धावान करू शकतो.

४. प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ३ दिंड्या असतात ह्या दिंड्या भक्तीगंगेमधुन फिरताना त्यांच्या सोबत पालखी असेल आणि त्या पालखीमध्ये पदचिन्हे असतील. त्या पदचिन्हांवर प्रत्येकाला डोके ठेवुन, हात ठेवुन नमस्कार करता येईल. ह्या पदचिन्हांशेजारीच श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पाद्यपुजन करतानाचे जल म्हणजेच अभिषेक जलाचा गडू ठेवण्यात येणार आहे.

गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र दिवशी सद्गुरू माउलीच्या दर्शनाचा प्रत्येक श्रद्धावानाला लाभ मिळावा म्हणून तीच सद्गुरू माउली किती धावपळ करत आहे. अश्या ह्या सद्गुरू मुलीला भेटायला तिचे प्रत्येक श्रद्धावान बाळ नक्की गुरुपौर्णिमेला हजार राहणार ना?

1 comment:

RAJEEV KADAM said...

Shree Ram for this important info.