Monday, October 4, 2010

AADM परेड फौन्डेशन डे

परेड विषयी बोलता बोलता मधेच गणपती बाप्पा आले आणि मग सुरु झाली परेड फौन्डेशन डे च्या तयारीची धामधूम. दर वर्षी आम्ही हा दिवस साजरा करतोच. पण तो असतो परेड DMVs साठीच फक्त. आणि ते सुद्धा मस्त पैकी सत्संग करायचा, खायचे आणि धम्माल करायची. पण ह्या वर्षीची गोष्टच निराळी. ह्या वर्षी दर वर्षी प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा आखून परवानगी साठी विचारणा केली तेव्हा एक आनंदाचा धक्का देण्यात आला. हा कार्यक्रम पूर्ण दिवसभराचा आणि हरीगुरुग्राम येथे करायचा असा निरोप आला. त्या साठी काय कार्यक्रम ठेवायचा हे ठरवण्यात आले. पूर्ण कार्यक्रम भक्तीमयच असणार हे वेगळे सांगायलाच नको. सकाळी ध्यानमंत्र, अह्निक, पादुका पूजन; दुपारी आदिमाता शुभंकर स्तवन, अशुभ्नाशिनी स्तोत्र, दत्तबावनी, गुरुचरित्र १४ वा अध्याय, दत्तमाला मंत्र, हनुमान चालीसा, गुरुमंत्र आणि मग सत्संग; तर संध्याकाळी घोरकष्टतोधोरण स्तोत्र पठण, सत्संग व महारती असा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम होता. परेडची सुरुवात २३ सप्तेम्बर२००३ पासून झाली. त्यामुळे २६ तारखेच्या रविवारी कार्यक्रम करण्याचे ठरले. मात्र बापुंची लीला नेहमी निराळीच. त्या दिवशी जागा उपलब्ध नसल्याने ३ तारखेला कार्यक्रम करायचे ठरले. ह्यात लीला ती कशी असा प्रश्न पडला काय? अहो विसरलात? ३ ऑक्टोबर रोजीच बापूनी १३ कलमी योजना जाहीर केली होती. आणि नेमका हाच हा दिवस मिळाल्यामुळे तर सर्वांचा उत्साह द्विगुणीत झाला. संपूर्ण सजावटी मध्ये १३ कलमातील एक एक कलम घ्यायचा प्रयत्न केला गेला आणि तीच थीम वापरली- दत्तबाप्पा, बापू, आई, दादा, व आद्य पिपादादाना लडयांचे हार, प्रवेशद्वारावर गोधडीचे तोरण, मक्याच्या कुंड्यांची मार्गदर्शिका, कागदाच्या लगद्यापासून केलेल्या गुढ्या, मधल्या वेळेत चालवण्यासाठी चरखे आणि महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्याची थीम होती, 'काय गोड गुरूची शाळा'. खर आहे ह्या शाळेची गोडी काही निराळीच, ती स्वतः अनुभवल्याशिवाय सांगून कळणारच नाही. काय नाही ह्या शाळेत? अध्यात्म आणि प्रपंच करून संपूर्ण जीवनविकास कसा घडवायचा हेच इथे शिकवले जाते आणि ते सुद्धा डायरेक्ट परमात्म्याकडून. आणि प्रवेश परीक्षा नाही की काही नाही. फक्त एकच अट- मला माझे प्रारब्ध बदलायचे आहे. बास्स. अडमिशन फी किती? २ पैसे!! काय झाले? चक्कर आली का? अहो २ पैसे म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. ह्या २ पैशांची किंमत साई बाबांच्या वेळी जेवढी होती तेवढीच आज पण आहे. आहे की नाही एकदम मस्त.     

तर अश्या ह्या धम्माल सोहळ्याची तयारी पण एकदम जय्यत सुरु होती गेले अनेक दिवस. प्रत्येक DMV तितक्याच उत्साहात तयारीला लागला होता. लड्या बनवण्यात, मका लावण्यात, गोधडी शिवण्यात सगळेच व्यस्त होते. कारण एकच- सर्वाना माहित होते, त्याला बोलवायचे कसे आणि त्याला काय हवाय आणि काय केले की तो आपोआप खेचला जायील, हे गुपित आम्हाला कळले होते. कसले गुपित म्हणता? ऐकायचे आहे? ते फक्त आम्ही आणि बापू ह्यांच्या मधलेच आहे बर का!
हा हा हा.. मस्करी केली. आपल्याकडे कसलीच गुपित नसतात. जे काही आहे ते पूर्ण transparent. भक्ती आणि सेवा ह्या मुळेच तो सदैव आनंदित होतो आणि जिथे त्याला हे आढळते तिथे तो धावत येतो आणि भरभरून देतो. जितका घाम सेवेत गाळला असेल तितक्या जास्त पटीत हा प्रेमाच्या वर्षावात न्हाऊ घालतो. प्रत्येक DMV प्रत्येक सेवेत हिरीरीने भाग घेतो. प्रत्येक सेवेच्या वेळी AADM च्या गणवेशात उभा असतो. इतर भक्त, सेवेकरी अगदी छान नटून थाटून येतात. पण हे DMV मात्र त्यांना दिलेल्या कामाच्या आड काहीच येऊ देत नाहीत. आपापले काम, कॉलेज, ऑफिस घर सांभाळून ही परेडची मुलं दर रविवारी न चुकता परेड ग्राउंड वर हजर असतात. परेड प्राक्टिस, रेस्क्यू प्राक्टिस करतात.

मैदानात शिकलेले टीमवर्क ह्या सोहळ्याची तयारी करताना पण उपयोगी आले. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पणे नियोजन करून करण्यात आली. त्या साठी वेगवेगळ्या कमिटी बनवल्या गेल्या. दिंडी, पादुकापूजन, सत्संग, पठण, स्वच्छता, सजावट, information hub अशा तब्बल १९ कमिटी बनवल्या होत्या. प्रत्येक कमिटीची जवाबदारी नवीन मुलांना दिली गेली त्यांच्या मदती साठी जुने DMV होतेच. सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून त्या प्रमाणे काम केले गेले. त्यासाठी मिटींग्स, प्राक्टिस सगळे चालू होते आणि ह्या सगळ्यात मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः स्वप्निल्सिंह बरोबर होतेच. तसेच हा कार्यक्रम संध्याकाळी सर्व भक्तांसाठी खुला असणर हे सांगण्यात आले त्यामुळे सर्वाना परेडची नीट माहिती मिळावी म्हणून 'Information hub ' तयार करण्याचे ठरले. सर्व तयरी मध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे इथे पूर्ण मुंबई आणि नवी मुंबई मधली सर्व परेड केंद्रे सहभागी होती. अगदी नालासोपारा पासून कळंबोली आणि डोंबिवली पर्यंतची सगळी मुळे तयारी मध्ये सहभागी होती. कोणीच वेळेचे, कामाचे, दूर राहण्याची कारण नाही दिले. तसेच अगदी लांब राहणार्यांसाठी जवळ राहणारी मुले त्यांना घरी जायला सांगून स्वतः थांबायची. त्यांची प्राक्टिस आधी घायचे आणि अगदी उशीर झाला आणि कोणी मुलगी एकटी जाणार तर तिला स्वतःचे स्टेशन नसताना मध्ये उतरून घरापर्यंत सोडून यायचे.

बापूंना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी काही DMV ची निवड झाली. संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात जितके टेन्शन आले नव्हते त्याहून अधिक टेन्शन आमंत्रणासाठी DMV ना निवडताना आले कारण तब्बल २००- २५० DMV पैकी फक्त १० जणांना संधी मिळाली होती. त्यातही पुढच्या वर्षी इतर DMV जातील हे आश्वासन मिळाल्यावरच हायसं झाले आणि १० जणांची निवड केली गेली. ह्यात सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे इतर कुठल्याच DMV ने मला जायला मिळाला नाही म्हणून खंत व्यक्त केली नाही जो तो माझ्या मित्राला/ मैत्रिणीला जायला मिळाला म्हणून आनंदात होता. बापू काय बोलले त्याना भेटल्यावर काय काय केले हे सर्वांसाठी महत्वाचे होते. परेड DMV ना त्यांची priority नीट माहिती आहे. आमंत्रणावरून आठवले आमंत्रण पत्रिका सुद्धा DMV नी स्वतः बनवली होती. आणि बापूंना आवडते म्हणून प्रत्येकाने स्वताच्या हाताने सुंदरकांड मधली ओवी लिहिली होती.

बापूंना आमंत्रण दिले तेव्हा ते सुंदरकांड बघून फारच आनंदित झाले. म्हणाले की सुंदरकांड त्यांची सर्वात आवडती गोष्ट आहे, सुंदरकांड मुळे संपूर्ण जीवनच सुंदर होऊन जाते आणि मातृवात्सल्याविन्दानम मध्ये सर्व काही आहे. तसेच व्यायामाचे महत्व सांगितले. मुलांसाठी जोर आणि मुलींसाठी सूर्यनमस्कार आणि दोरीच्या उड्या (लंगडी सारख्या) हे व्यायाम सोपे, कमी वेळात होणारे आणि फायदेशीर आहेत. इतके सांगितल्यावर हे जर करणार तरच मी कार्यक्रमाला येणार हे सांगायला ते विसरले नाहीत. 

बापूंना commit करून हे सगळे निघाले ते तडक कार्यक्रमाच्या तयारीसाठी. २ दिवस पण राहिले नव्हते आणि खूप काही करायचे होते. शनिवारी रात्री जागा स्वच्छ करून, सजावट उभारून तयार होती.

सगळेच जण दुस्र्यादिवासाची आतुरतेने वाट बघत होते. आणि तो दिवस उजाडला.

त्या दिवशी काय काय केले ऐकायचे आहे? थोडे थांबा तर. त्या सोनियाच्या दिवसाची गम्मत ब्रेक के  बाद.

3 comments:

Mannmath said...

hari om preetiveera

Lay masta ga!!!!

aapalya parade dmv a molachi sandhi milali hoti aani tya sandhiche purna pane sone kele....

tu aata lavkar pudhe kai jhale te lih...ha break nahi sahan honar mala...

purna details hai tumha purna divas asanarya dmv kadhunach milatil...mala mahit aahe

plz lav kar lih

Sangita Vartak said...

Hari om
Priti mastch
itake mast ki
aata ha break nako vatato
pan thik aahe vaat pahanyat suddha maja aahe
karan tyanantar asech chan vachayala milel nahi ka?
hari om

Prasad said...

all parade boys and girls
say shree ram.