एक अविस्मरणीय अनुभ
जळगावच्या श्रीहरीगुरुग्राम मध्ये. काय? आश्चर्य वाटले न? परम पूज्य बापूंनी अनिरुद्ध आनंदोत्सव वेळी प्रवचनातून सांगितले की जेथे त्यांची आई उभी राहिली ते हरीगुरुग्राम. खरच अतिशय भव्य सोहळा रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०११ रोजी जळगाव येथे संपन्न झाला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी जळगाव व जवळच्या उपासना केंद्रांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. परम पूज्य बापूंचे जळगाव स्टेशनवर आगमन झाल्यावर जळगाव वासीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी अतिशय आनंद व जल्लोषात आपल्या लाडक्या देवाचे स्वागत केले.
परम पूज्य बापूंच्या आगमनानंतर सर्व प्रथम अनिरुद्धाज अकॅडेमी ऑफ डीजास्टर मेनेजमेंट अंतर्गत चालणार्या परेड प्रोजेक्टच्या कार्यकर्त्यांनी परेड संचलन करत बापूंना मानवंदना दिली व बापूंनी सल्यूट देऊन ती मानवंदना स्वीकारली.
संचलनानंतर लगेच प्रवचनाला सुरुवात झाली व सर्व श्रद्धावानांना बापूंनी तपस्चर्या सुरु केल्यानंतर प्रथमच बापूंचे शब्द कानी पडले. त्या प्रवचनातील काही संक्षिप्त मुद्दे खालीलप्रमाणे:
१. अनिरुध्द आमचा आहे असा थोडा तरी विश्वास असेल तर स्वतःला कमी लेखू नका.
२. बापूला जात नाही. श्रद्धावानाची जी जात तीच बापुची जात
३. बापू संत नाही कारण संताना partiality करता येत नाही
४. बापू कधीच म्हणणार नाही की तुम्ही लढा मी पाठीशी उभा आहे. बापू म्हणतो लढायचं आहे न, तू जीप मध्ये बस मी जीप चालवतो.
५. आम्ही भक्ती मार्गात पुढे जात असताना मी पापी आहे असे म्हणू नका. परमेश्वराला हे आवडत नाही.
६. भक्ती करणार्यांमध्ये ताकद असते. शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, राणाप्रताप हे सगळे भक्ताच होते. अल्बर्ट ऐन्स्तैन, अल्बर्ट स्वत्झ्नेर हे पण भक्तच होते.
७. एक तरी उदाहरण सांगा जेथे नास्तीकाने काही भले केले आहे. हिटलर ने स्वतःची आणि देशाची वाट लावली.
८. देवाची भक्ती करताना भीती बाळगू नका.
९. जीवनाचा उपभोग घ्यायला शिका चांगल्या मार्गाने.
१०. चुकत असाल, हे कलियुग आहे.
हे पण हरीगुरुग्राम आहे. जिथे माझी आई उभी ते हरीगुरुग्राम.
माझ्यावर खरंखुरप्रेम करत असाल तर तेवढ्या प्रमाणात मला तुमचे पाप द्या. पण माझी अट एकच, भगवंताला विसरू नका.
प्रवचनानंतर सत्संग व दर्शनाचा कार्यक्रम झाला. बापूंना सत्संगात नाचताना पाहून सर्व श्रद्धावान अतिशय आनंदित झाले.
दर्शनाच्या वेळी सुद्धा कार्यकर्त्यांच्या शिष्टबद्ध नियोजनामुळे सर्वाना व्यवस्थित दर्शन मिळाले.
दुसर्या दिवशी कार्यकर्त्यांसाठी सत्संगाचा कार्यक्रम होता. तिसर्या दिवशी बापू जळगाव वरून निघताना सर्वांनाच खूप भरून आले होते. बापू परत कधी येणार. लवकर या हेच सगळे जण आळवणी करत होते. मुंबई मध्ये सुद्धा बापूंचे प्रत्येक स्टेशन वर भक्तांनी अतिशय जल्लोषात स्वागत केले.