Saturday, June 18, 2011

गुरुचरण महिना


गुरुवार दि. १६ जून रोजी प्रवचनात परम पूज्य बापूनी वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा
ह्या महिन्याचे महत्व सांगितले आणि ह्या महिन्याला "गुरुचरण महिना " असे नाव
दिले. ह्या महिन्यात कमीत कमी एक वेळा तरी एका दिवसात १०८ वेळा हनुमानचलीसाचे
पठण करावयाचे आणि इतर दिवशीसुद्धा जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा
म्हणायची किवा 'ओम श्री राम्दुताय हनुमन्ताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः' किवा
'ओम कृपासिंधु श्री साईनाथाय नमः' किवा 'ओम मनःसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय
नमः' हा मंत्र म्हणावयास सांगितले आहे. 


Monday, April 4, 2011

शुभंकरा नवरात्र

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला आरंभ झाला. २०१० मधली अश्विन नवरात्री आणि २०११ मधली चैत्र नवरात्री ही खूप आगळीवेगळी आहे. दर १००० वर्षांनंतर हा योग येतो जेव्हा महिशासुरमर्दीनीचे ९ ही अवतार नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी तितकेच समानपणे कार्यरत असतात.

अशी ही चैत्र नवरात्र श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे साजरी केली जात आहे. प्रत्येक श्रद्धावान भक्ताने ह्याचा लाभ जरूर घ्यावा.
देवीच्या ह्या उत्सवात नऊ रात्रींचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच सद्गुरू बापूंनी नवरात्रोत्सवात रात्र जागरण अवश्य करावे असे सांगितले आहे. रात्र जागरण करताना अशुभनाशिनी स्तवनम, शुभंकरा स्तवनम, रामरक्षा, श्री गुरुक्षेत्रम मंत्र, इ. चे पठण करू शकतो. तसेच मातृवात्सल्यविन्दानम व रामरसायन ह्यांचे पठण अवश्य करावे. रात्री ९.३० ते २.३० पूर्ण वेळ करावे. पूर्ण रात्र जागरण करून पठण केल्यास अतिशय श्रेयस्कर. सद्गुरू बापूंची ग्वाही आहे की मातृवात्सल्यविन्दानम चे पठण करताना ती आदिमाता साक्षात तिथे येऊन ते पठण श्रवण करते व जिथे आदिमाता तिथे तिचा पुत्र परमात्मा असतोच असतो. त्यामुळे श्रद्धावानांसाठी ही अत्युच्च गोष्ट आहे. 

(बापूंनी सांगितले की जागरण करतेवेळी इतरांना, शेजार्यांना त्रास होऊ नये ह्याची दक्षता बाळगावी तसेच झोप येत असल्यास कडू चवीचा पदार्थ खावा. उदा. कढीपत्ता)        

Tuesday, March 1, 2011

रामराज्याचा मूळ गाभा- "ग्रामविकास"


"भारतमध्ये ७ लाख खेडी आहेत. ग्रामीण जीवनाचा विकास झाल्याशिवाय रामराज्य भारतामध्ये अवतरू शकत नाही"- अनिरुद्ध बापू (६/५/२०१०)

रविवार २० फेब्रुवारी २०११ रोजी परम पूज्य बापू, परम पूज्य नंदाई व परम पूज्य सुचीतदादा यांनी सहकुटुंब गोविद्यापीठम येथे भेट देऊन आतापर्यंत स्वप्निलसिंह व त्यांच्या टीमनी केलेल्या ग्रामविकासाच्या कामाची पाहणी केली व मार्गदर्शनही केले. त्याचाच हा सचित्र वृतांत.  

ग्रामविकासाचा श्रीगणेशा, गोविद्यापीठम येथून झाला आहे.  
फळबागेची माहिती देताना स्वप्निलसिंह व कौतुकाने ऐकताना नंदाईदिसत आहेत.
. साईसत्चरितातील २ शेळ्यांची गोष्ट आठवते न ? शेळ्यांवर माया करताना नंदाई व बापू. ह्या शेळ्या पशुपालन उपक्रमांतर्गत पाळल्या आहेत 
पशुपालन अंतर्गत पाळलेल्या वासरांवरून प्रेमाने हात फिरवताना नंदाई 


चारा वैरण अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करताना परम पूज्य बापू आणि परम पूज्य नंदाई 


परस बागेतील भाज्यांच्या लागवडीची पाहणी करताना बापू आणि नंदाई 


सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत खत तयार करण्यात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या गांडूळना उत्साहाने न्याहाळताना बापू, नंदाई व स्वप्निलसिंह  

पाण्याच्या टंचाई वर मात करण्यासाठी बांधलेले शेत तळ्याची पाहणी करताना बापू, आई, दादा  

वनराई बंधार्यात अडवण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बापू आणि नंदाईला सांगताना  स्वप्निलसिंह 

बापू, आई आणि दादा, वनराई बंधार्याची पाहणी करताना
ही तर झाली २० तारखेची सफर बापू, आई आणि दादांबरोबर. लवकरच आपण पुन्हा भेटूया 'Aniruddha's   Insitute of Gramvikas ' संदर्भात अधिक माहिती चित्र व लेखमालेतून घेण्यासाठी.  

Saturday, January 29, 2011

२६ जानेवारी २०११- अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंट- परेड संचलन

भरपूर दिवसांच्या विश्रांती नंतर आज पुन्हा आपण भेटत आहोत. कारण ही तसेच आहे. २६ जानेवारी रोजी श्री गुरुक्षेत्रम येथे झालेले ध्वजारोहण व अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंट च्या अंतर्गत चालणार्या परेड प्रोजेक्ट चे संचलन. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. मग चीफ परेड कमांडरने मान्यवरांना रिपोर्टिंग केली व 'अनिरुद्ध पथक, दहिने से तेज चल' ही कमांड देऊन संचलनाची सुरुवात झाली. सर्व प्रथम राष्ट्रीय ध्वज मग संस्थेचा ध्वज व त्या मागे सर्व प्लाटून, अशा पद्धतीने संचलन सुरु झाले. मुंबई मध्ये एकूण ११ परेड केंद्रामधल्या २०६ परेड DMVs (८ प्लाटून) नी संचलनात भाग घेतला होता. ह्या वेळी विशेष गोष्ट म्हणजे जे आधी चीफ कमांडर होऊन गेले आहेत असे सर्व DMVs आता consultant म्हणून परेड मध्ये सामील झाले आहेत त्या मुळे पहिल्यांदाच (अनिरुद्ध पोर्णिमे व्यतिरिक्त) त्यांच्या squad ने पण संचलन केले. 

मुंबई व्यतिरिक्त पुणे (६४ द्म्व्स) , रत्नागिरी (४७ द्म्व्स) व सातारा (१५ DMVs) येथे सुद्धा अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंटच्या DMVs नी परेड संचलन केले. अनिरुद्ध पोर्णिमे नंतर सर्व परेड DMVs चा उत्साह द्विगुणीत झाला आहे. मुंबईच नव्हे तर मुंबई बाहेरील अनेक ठिकाणी परेड प्राक्टिस नियमित सुरु आहे व अनेक उपासना केंद्रांवर लवकरच सुरु होणार आहे. सध्या ३ नवीन केंद्रावर परेड सुरु झाली आहे. बापू कृपेने लवकरच इतर केंद्रांवर पण सुरु होईल. परेड चा पाया भक्कम करण्यासाठी administrative तयारी पण जोमाने सुरु आहे. त्यामुळे थोड्याच अवधीत परेडचे नवीन स्वरूप आपल्या सर्वांसमोर येईल.

परेड विषयी आपल्या गप्पा चालू राहणारच आहेत. पण तोवर परेड संचलनाच्या video वर समाधान मानूया.
 

AADM Parade 26 January 2011

Sunday, January 9, 2011

'श्रीमंगलचंडिकाप्रपत्ति'

६ में २०१० रोजी श्री हरिगुरुग्राम येथे सद्गुरु बापूनी केलेले 'रामराज्य २०२५' ह्या विशेष प्रवचनामध्ये 'श्रीमंगलचंडिकाप्रपत्ति' ह्याची सखोल माहिती दिली होती. ह्या वर्षी १५ जानेवारी रोजी ही प्रपत्ती स्त्रियानी करावयाची आहे. त्या विषयी गेल्या गुरुवारी, ६ जानेवारी रोजी सद्गुरु बापूनी भक्तांच्या शंकांचे निरसन केले. ती माहिती खाली दिलेल्या लिंक वर मिळेल.
http://manasamarthyadata.com/uploads/Queries.pdf 

http://manasamarthyadata.com/uploads/Poojan%20Arrangement.पीडीऍफ़


श्रीचंडिका उपासनेमुळेच रामराज्य सत्यात उतरणार आहे. ह्या उपासनेमध्ये ५ तत्वे खूप महत्वाची आहेत त्यातले चौथे तत्वे म्हणजेच, 'माय चंडिके, तू मला स्वतः जवळ घे आणि परमात्म्याच्या हाती सोपव', अशी चंडिकेला प्रार्थना करून ही प्रपत्ती करणे.

Saturday, December 18, 2010

'Shree Kanthakoop Paashan'

On Thursday, 16th December 2010, Param Poojya Sadguru Shree Aniruddha Bapu, Nandaai & Suchitdada performed the First Poojan of 'Shree Kanthakoop Paashan' at Shree Harigurugram at 7.30pm. The Poojan videos are now uploaded in the Video Gallery at www.manasamarthyadata.com/vgallery.php

Every devotee can perform this Poojan at their home. The booking for Poojan can be done at 5th Floor, Happy Home and respective Upasna Centers.

Saturday, December 11, 2010

अनिरुद्ध पौर्णिमा २०१०



हरी ओम,


भरपूर दिवस झाले गप्पा मारून नई? कसे जात आहेत दिवस पत्ताच लागत नाही. म्हणता म्हणता २०१० वर्ष संपत आलं. अनिरुद्ध पौर्णिमेच्या गडबडीत दिवस पटापट जात होते. अनिरुद्ध पौर्णिमेची परेड अतिशय छान झाली. सर्वांकडून खूप कौतुक झाले परेडचे (श्रीराम). ह्या वर्षी परेड ची संख्या तर अफाट होती. तब्बल ७५० DMVs नी ३० प्लाटून मधून मार्चपास केले आणि ह्यात सर्वात जास्त संख्या होती ती मुंबई बाहेरील DMVs ची आणि ते सुद्धा लहान लहान गावातून सुद्धा बरीच मंडळी आली होती. संस्थेतर्फे कोल्हापूर मेडिकल कॅंप जिथे आयोजित केला जातो त्या गावातील मुलेसुद्धा परेड मध्ये सहभागी होती. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन; yes मला माझ्या बापूला सल्यूट  करायचा आहे. आणि म्हणूनच तो भावाचा भुकेला देव पण त्याच्या बाळांना सल्यूट करतो.   

परेड करताना बापूंचे शब्द ' बाळानो तुम्ही परेड करता म्हणून मी सल्यूट करतो' हे वाक्य आठवत होता आणि तो क्षण आला. बापूंच्या समोरून त्यांना सल्यूट करत जाताना होणारा आनंद तर अवर्णनीयच. तो फक्त अनुभवता येतो. शब्दात मांडणे कठीण. सगळेच्या सगळे परेड केलेली मंडळी हेच उत्तर देतील आणि ते उत्तर शोधण्यासाठी तरी प्रत्येकाने एकदा तरी परेड करावीच. त्या बापूरायाला  सल्यूट  करणे, त्याचा कडून तो सल्यूट घेणे म्हणजे अगदी out of this world feeling असते. 

ह्या वर्षी तर सर्वत्र परेड एकदम छा गई. कारण अनिरुद्ध पौर्णिमेनंतर होणार्या अधिवेशनामध्ये तर श्री समीरदादानी घोषणा केली की प्रत्येक उपासना केंद्रावर परेड ग्रुप सुरु व्हायला हवे आणि तिथे फक्त परेडच नव्हे तर रेस्क्यू प्रॅक्टीस, फायर फायटिंग ट्रेनिंग, स्पोर्ट्स हे सर्व असणार आणि एक रविवार संस्थे तर्फे आयोजित निष्काम भक्तिमय सेवेसाठी राखीव असणार. तसेच ५ वा रविवार सुट्टीचा. मग काय मज्जाच मज्जा. आज पर्यंत परेड म्हणजे बर्याच जणांना १-२-१ असेच वाटायचे पण आता कळेल की काय काय धम्माल असते.     

अधिवेशनात घोषणा झाल्यावर तर ह्या रविवार पासून मुंबईत जोगेश्वरी व मरोळ येथे २ नवीन परेड केंद्र सुरु देखील झाली आणि घोषणा व्हायच्या आधीच परेड मार्चपास बघून पार हैदराबाद आणि लखनौ कडून विचारणा सुद्धा झाली. लवकरच तिथे पण बापू कृपेने परेड सुरु होयील.      

हीच तर गम्मत आहे ना जितकं देता तुम्ही त्याच्या किती तरी पटीने जास्त मिळते. हा बापू फक्त देण्यासाठी आलाय. बापूला आवडणाऱ्या ९ थेंबांमधे परमेश्वराच्या कार्यासाठी व सेवेसाठी परिश्रम करताना येणाऱ्या घामाचे थेंब ह्यांचा पण समावेश आहे.

शेवटी प्रश्न ज्याचा त्याचा आहे, 'त्या'ला आवडणाऱ्या गोष्टी द्यायच्या की नाही !! 


(अनिरुद्ध पौर्णिमा २०१० ची मार्च पास बघण्यासाठी www.manasamarthydata.com ह्या website वर भेट द्या)