AHILYA SANGH

३ ऑक्टोबर २००३: परम पूज्य सद्गुरू बापूनी १३ कलमी योजना जाहीर केली. त्यावेळी त्यांनी म्हटले होते- 
"अहिंसा शब्दामध्येच हिंसा आहे. हिंसेचा नाश करण्यासाठी जे काही करावे लागेल ती अहिंसा. ज्या दिशेन आज प्रत्येक राष्ट्राचे राजकारण चाललेल आहे, त्याच्यावरून जे अराजक होणार आहे त्याची नांदी केव्हाच झाली आहे. लवकरच उत्पन्न होणार्या उलाढालींमध्ये भारताचे स्थान अत्यंत महत्वाच आहे हे लक्षात ठेवा. पुढचे जे काही मुद्दे मी मांडणार आहे, तो माझा १३ कलमी कार्यक्रम आहे."

त्यातले आठवे कलम म्हणजे अहिल्या संघ. बापूंच्या शब्दातच अहिल्या संघाची ओळख आपण करून घेऊया.

"अहिल्या- स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. अहिल्या म्हणजे भारतीय स्त्रीच्या दुःखाच मूर्तिमंत रूपक. एक नालायक इंद्र येतो आणि तिच्या नवर्याचा रूप घेऊन तिला भ्रष्ट करतो आणि तेवढाच नालाय्यक असणारा तिचा पती तिला शाप देऊन मोकळा होतो की तू शिळा हो. कुठलाही अपराध नसलेली ती स्त्री वर्षानुवर्ष शिळा बनून वाट बघते त्या रामाची... कधी येऊन हा माझा उद्धार करेल. नालायक समाज, आणि नालायक पती यांच्यामध्ये सापडली अहिल्या, म्हणजे दुर्दैवी भारतीय स्त्रीच मूर्तिमंत रूपक. आज भारतीय स्त्री परत संकटात सापडली आहे. तिला रस्त्यामध्ये जाळलं जातंय, तिच्या मदतीला कोणी येत नाही. चारचौघांच्या देखत तिच्यावर बलात्कार केला जातोय, तिच्या मदतीला कोणीही येत नाही. कशाला तोंड बघता पुरुषांचं, तुम्हाला मदत करतील म्हणून. तुमच्या नंदावहीनिन्च्या मार्गदर्शनाखाली अहिल्या संघाची स्थापना केली जाईल. स्त्रियांनी स्वतःच समर्थ होण्यासाठी. त्यांना त्रास देणाऱ्या प्रत्येकाला योग्य तो धडा शिकवण्यासाठी. योग्य तो म्हणजे योग्य तो. प्रार्थना करून आणि जप करून असले लांडगे ऐकत नसतात हे लक्षात ठेवा. एका सद्गुरुंकडे अशीच एक बाई आली. म्हणाली, सद्गुरू, हा माझा ऑफिसमधला बॉस मला खूप त्रास देतो. मला नोकरी करणा खूप आवश्यक आहे. मी काय करू? आणि जर मी त्याला बधले नाही तर तो माझ्यावर किटाळ आणून मला हाकलवून लावू शकतो. मी विधवा आहे, माझी तीन मुलं आहेत. माझे आईवडील, सासू पण माझ्यावरच आहे. मला भीती वाटते. हा सद्गुरू पक्का बनेल होता. बनेल म्हणजे चांगल्या अर्थाने. तो मंत्रतंत्र सांगणारा नव्हता. त्याने तिला तिच्या हातात एक चाकू दिला. म्हटलं हा चाकू हातात धार आणि तो रंगात आला की योग्य ठिकाणी वापर कर. तो भांडणार पण नाही. आणि जगू पण शकणार नाही. आज ती व्यक्ती अशाच अवस्थेत जगते आहे हे लक्षात ठेवा. मेलेली पण नाही पण जिवंत असून कशाशी काहीच उपयोग नाही. अशी जर भारतीय स्त्री बनली तरच तिच्या नशिबातले हे सगळे कष्ट दूर होतील हे लक्षात ठेवा. अशी स्त्री मला बनवायची आहे. अहिल्या संघाद्वारे. ज्या बलविद्या मी आचार्य रवींद्र मंजरेकराना शिकवल्या त्या याच्यापुढे स्त्रियांसाठी मी मुक्त करतो आहे. स्त्रियानो, स्वतःची ताकद स्वतःच वाढवा. भाऊ मदतीला येईल आणि बाप मदतीला येईल, नवरा मदतीला येईल आणि मुलं येतील आणि समाज येईल. द्रौपदीच्या समोर तिचे पाचही नवरे होते, तिचे सासरे होते, धर्माचार्य होते, कोण आलं मदतीला? कुत्रासुद्धा नाही आलं. आलं तो फक्त श्रीहरी...एकच. आज त्याचीही वाट बघू नका. तुम्ही तयार  व्हायला लागा. श्रीहरी नक्कीच धावून येईल. पण बळ तुम्हाला कमवायचंय. याचा अर्थ तुम्ही चाकू चालवायला शिका असा गैरसमज करून घेऊ नका. पण सर्व संरक्षक विद्या तुम्हाला शिकवल्या जातील आणि याची ठिकठिकाणी केंद्र भारतभर स्थापन केली जातील हळूहळू याची खात्री बाळगा. स्त्रियांची शक्ती अमाप आहे. ती शक्ती वर्षानुवर्ष कापली गेली. ती परत जिवंत झाली पाहिजे. मात्र यामध्ये या संघाच्या नेत्यांनी पहाव लागेल की खरा आरोप आणि खोटा आरोप. ४९८/अ नावाच एक कलम निर्माण केलं गेलं आहे, की कुठल्याही नवविवाहित स्त्रीने तक्रार केली- लग्नानंतर आठ वर्षांच्या आत, तिच्या सासरच्या मंडळीनी हुंड्यासाठी तिचा छळ केलं, तर विनाचौकशी त्यांना अटक केली जाते. आणि मग चौकशी केली जाते. शक्ती बरोबर रिस्पोन्सिबिलिटी पण यायला हवी. हे या चळवळीच्या नेत्यांना कराव लागेल. अहिल्येचा उधार करण्यासाठी राम येण्याची वाट बघू नका. अहिल्येने स्वतःची सुटका स्वतः करून घ्यायला हवी. आणि वेळ पडल्यास तिनेसुद्धा शापवाणी उच्चारायला समर्थ व्हायला हवं. हीच माझी अपेक्षा आहे. त्याच बरोबरीने ज्या स्त्रियांवर अत्याचार झालेला आहे, ज्या स्त्रियांवर संकटं कोसळलंली अशा एकाकी स्त्रियांना आधार देण्याचं कामही अहिल्या संघ करेल. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनाधीन नवर्यामुळे ज्या स्त्रियांची वाट लागते, त्या स्त्रियांना मदत करणं म्हणजेच व्यसनमुक्तीला हात लावणं, हे ड्युअल- दोन्ही प्रकारच कार्य हा अहिल्या संघ करेल, हे लक्षात ठेवा, अहिल्या संघ म्हणजे स्त्रीमुक्ती आंदोलन नव्हे. तर अहिल्येसारखी परिस्थिती कुठल्याही स्त्रीच्या नशिबात परत कधीच येऊ नये म्हणून स्थापन झालेला संघ, हे लक्षात ठेवा. हा अहिल्या संघ आज पासून स्थापन झाला, हे समजून चालायचं. प्रत्येक केंद्रावरून त्याची वैयक्तिक माहिती दिली जाईल. आणि त्यानुसार हा संघ चलविला जाईल, हे लक्षात ठेवा. कसल्या लबाड्या नाही करण्यासाठी नाही. कसल्या मारामाऱ्या करण्यासाठी नाही. तर स्वतः समर्थ होऊन स्वतःवरचे अत्याचार पूर्णपणे थांबविण्यासाठी."


ही झाली अहिल्या संघाची ओळख बापुन्च्याच शब्दात  पुढच्या भागामधून आपण बघूया अहिल्या संघाची आता पर्यंतची वाटचाल....



7 comments:

Mihir Nagarkar said...

Very useful and nice information

Kapil Bodke said...

Hariom,

Nice blog with useful information.. Keep Writing.

Anonymous said...

A Highly needed refresher course.... say Shriram.!

Anonymous said...

hari om pritiveera.khupach chan.i'm eager abt further

Parineeta Raut said...

Hari Om Priti veera... I think every female should learn this art to protect herself. By learning this art I feel brave n physically fit...

Anonymous said...

Dear Preetiveera,

Hari Om,

Very well timed refreshing article.
I hope all women become Veeranganas and fight their Prarabdhas under the devine Guidance of p.p. Nanadai

Best wishes for future write-ups.

Dr. Prasadsinh Gole said...

Hari Om,
Hey really nice one.Good to hear again from Bapu of Ahilya sangh.