प्रत्येकाच्या मनाची हीच परिस्थिती असते नाही का? आपण किती ही मोठे झालो, वयाने, हुद्द्याने वाढलो तरी मन रमते ते बालपणीच्या आठवणींमध्ये. अस काय होत लहान असताना जे आता नाही? ते मुक्तपणे बागडणे एक अभ्यास सोडला तर कसलीच चिंता नसणे. अजून काय होते बरे त्या लहानपणी? बरोबर ओळखलेत. मनसोक्त खेळणे!! शाळेतून येउन दप्तर टाकून खेळायला पळायचे ते थेट आईची हाक येई पर्यन्त नुसते खेळ एके खेळ. तेव्हा इतर काहीच सुचायचे नाही. आपल्याच वयाचे किवा थोडे फार लहानमोठे मित्रमैत्रिणी. खेळ तसे अनेक किवा तेच पण खेळायची मज्जा काही निराळीच. मैदानीतील दगड शोधून लगोरी खेळणे किवा झाडाच्या फांद्यांचा विटीदांडू बनवून खेळणे ह्यामुळे जुगाड प्रकाराची प्रत्येकाला तोंड-ओळख लहानपणीच झालेली असते. खेळाचे साहित्य नाही म्हणून खेळलो नाही असे कधीच झाले नाही. दरवाजाचे स्टंप बनवून घराच्या बाहेर पेसेज मधले क्रिकेट आठवून अजूनही तसाच आनंद होतो. कुठे हरवले ते दिवस? कॉलेज मध्ये मैदानी खेळांची जागा कट्ट्यावरील गप्पांनी कधी घेतली आणि नोकरी व्यवसाय सुरु झाल्यावर कट्ट्याची जागा कॉम्पुटर आणि इंटरनेट ने कधी घेतली हे कळलेच नाही. वर्चुअल जगात खेळ सुद्धा ऑनलाईन झाले आणि आपण त्या मनमुराद हसण्या खिदळण्याला कधी पारखे झालो कळलेच नाही. साधे सर्दी पडसामुळे कधी एखाद दिवस खेळायला आईने जाऊ नाही दिले तर जीवाची जी घालमेल व्हायची ती आता इतके अनेक वर्ष न खेळता गेली तरी ती घालमेल अजूनही मनाच्या कुठल्यातरी कोपर्यात नक्कीच होत असेलच.
आपली ही परिस्थिती आपल्या आईवडिलांशिवाय कोणाला कळणार? म्हणूनच आपल्या डॅड ने (परम पुज्य अनिरुद्ध बापू) आपल्याला सांगितले आहे 'जी भरके खेलो'. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः १० वर्ष स्वतः संशोधन करून अनिरुद्धाज इन्स्टीट्युत ऑफ स्पोर्ट्स अंड बोन्साई स्पोर्ट्स ची स्थापना केली व त्या अंतर्गत प्रत्येक उपासना केंद्रावर हा स्पोर्ट्स उपक्रम सुरु करायचा आहे. प्रत्येक श्रद्धावानाने खेळावे आणि आनंद मिळवावा तसेच त्यातून शरीराला आणि मनाला मिळणाऱ्या फायद्यांचा लाभ घ्यावा हीच बापूंची इच्छा आहे. ह्या संस्थे अंतर्गत १९ जणांचा स्टडी ग्रुप तसेच ७० प्रशिक्षक तयार झाले आहेत आणि सध्या २२० श्रद्धावान प्रशिक्षण घेत आहेत. जे सर्व उपासना केंद्रावर जाउन तेथील श्रद्धावानांना विविध प्रकारचे तसेच लहान जागेत कमी माणसात खेळता येतील असे खेळ शिकवतील. तसेच हा उपक्रम ६ पुरुषार्थ मंडलं कलश येथे दर रविवारी सकाळी ७.३० ते ९.३० ह्या वेळेत सुरु आहे आणि पुढील महिन्यात आणखीन ४ उपासना केंद्रावर सुरु होत आहे.
पुन्हा एकदा ते मनसोक्त खेळण्याचे आणि आनंदाचे क्षण अनुभवायचे असतील तर आपण सुद्धा ह्या उपक्रमात नक्की भाग घेऊया आणि जी भरके खेलो ह्या आवाहनाला प्रतिसाद देऊया.